*** तीन गाळणी ***


*** तीन गाळणी ***

* सौक्रेटीस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता . एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू लागला , " अहो ....तुमच्या मित्राबद्दल मी आताच काय ऐकले ? तुम्हास माहीत आहे की नाही ? "
" भल्या माणसा , थोडा वेळ थांब , " सौक्रेटिसने त्याला थांबवले . कोणतीही गोष्ट ऐकण्यापूर्वी मी ती माझ्या तीन गाळण्यातून गाळून घेतो व नंतर ऐकतो ."
" तीन गाळणी ? काय , आहेत तरी काय ती ? "

" हे पहा , माझे पहिले गाळणे आहे , माहितीची सत्यता ! तुम्ही जे मला सांगणार आहात ते स्वत: पाहिले आहे काय ? "
" नाही , मी ऐकले आहे ." तो माणूस बोलला .

" ठीक आहे ." सौक्रेटिस म्हणाला . " आता दुसरे गाळणे .  मला असे सांगा की ते माझ्या मित्राबद्दल चांगले आहे की वाईट आहे ?"
" ओ ..... खरे तर ते चांगले नाही !" तो माणूस बोलला .
" म्हणजे तुम्ही अशी गोष्ट सांगणार आहात जी माझ्या मित्राबद्दल वाईट आहे , मात्र तिच्या सत्यतेबद्दल तुम्हाला कांही माहीत नाही ! बरोबर ? " सौक्रेटिसने विचारले . "

ठीक आहे . आता आपण तिसरे गाळणे लावूया . कदाचित त्यातुन तुम्ही खरे उतराल ."
" तिसरे गाळणे आहे उपयुक्ततेचे ! तुम्ही जे मला सांगणार आहात ते माझ्यासाठी फायद्याचे आहे का ? "
" खरे तर नाही !" तो माणूस बोलला .
" हे पहा ," सौक्रेटिस म्हणाला , " जी गोष्ट माझ्या फायद्याची नाही , माझ्या मित्राबद्दल चांगले सांगीत नाही आणि जी खरी किंवा खोटी हे माहीत नाही , अशी गोष्ट ऐकून मी काय करणार ? म्हणून तुम्ही ही मला अजिबात सांगु नका . बाय ! "
.....आणि सौक्रेटिसने आपले काम पुढे चालू केले .

* मित्रानो , कोणाबद्दल ऐकण्यापूर्वी ही तीन चाळण अवश्य वापरा . तुमचा बहुमोल वेळ वाचेल आणि मित्रांबद्दलचा गैरसमज होणार नाही . आयुष्य सुखी होईल !!!

0 comments :