-------------------------------
आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन
सतत शोषण आणि जुलूम हे .... ज्यांच्या राजकारणाचं सुत्र होत... माणुसकीला काळिमा फासणारे अत्याचार. .. हे ज्यांच्या कारभाराचं लक्षण होतं... भारतीयांचं दारिद्रय आणि अज्ञान. .. हे ज्यांचं भांडवल होतं... ते मोठ्या गर्वाने सांगत होते. .. की आमच्या साम्राज्यावर.... सूर्य कधी मावळत नाही. .. त्यांच्याजवळ आधुनिक हत्यारं होती.... सुसंबद्ध सेना होती.... आणि मतलबी राजकारणाचं तंत्र होतं...... अशा ब्रिटिशांना देशातून .... हाकलून देण्यात... सशस्त्र क्रांतीकारक..... स्वातंत्र्यसैनिक यशस्वी झाले. ... भारताच्या स्वातंत्र्याच्या ... आभाळात 129 वर्षांच्या अंधाराला ..... छेद देऊन स्वातंत्र्याच्या सूर्याचे किरण झगमगू लागले. .. श्रावण अमावस्येला. (15 ऑगस्ट 1947 ) देश स्वतंत्र झाला. ..................
देश स्वतंत्र झाला ...... पण आपण स्वतंत्र झालो का . .....
आपल्याच जुन्या जातीपातीच्या .... ?
भेदाच्या.....?
घोर अंधश्रद्धांच्या ओझ्याच्या ?
जुन्या गैरसमजूतीच्या ?
नशेच्या विळख्याच्या
आणि
त्यातून येणाऱ्या विपन्नावस्थेच्याही ?
जाचक बेड्यातून आपण कसे स्वतंत्र होणार. ...?
कधी ज्ञानाचा प्रकाश पहाणार ?
कधी विचारांच्या
आणि
तर्काच्या कसोटीवर
घासूनपुसून घ्यायला शिकणार. .?
कशा झुगारता येतील या जुन्या. .. गुलाम बनवून ठेवणार्या. . असहाय.. हतबल गोष्टी. ..?
आज स्वातंत्र्यदिनानिमित्त
भारतमातेला सलाम करताना
वायदा करु या...!
मनावरची .. विचारांवरची
जुनाट बंधनं झुगारून आम्ही
विचारांची विवेकी वाट नक्की शोधू...
खऱ्या अर्थाने विचारी
आणि
स्वतंत्र होऊ....
प्रयत्न करायला हवा.....
मनापासून. ....
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!
भारतमाता कि जय.. !
---------------------------------
0 comments :